⁠ 
रविवार, मे 5, 2024

सावधान… चाळीसगावात तितूर नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, घाटात दरड कोसळली

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । कोदगाव धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढल्याने तितुर नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे चाळीसगाव शहरासह अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे पुरामुळे रोकडे, बाणगावसह अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाघडू फुलावर देखील पाणी आहे आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना सोबत घेऊन काही भागांना भेट देत लागलीच पाहणी केली. प्रशासनाकडून नागरिकांना त्याच्या सूचना देण्यात आले आहे.

कन्नड घाटात दरड कोसळली

रात्री पावसामुळे कन्नड घाटात दरड कोसळलेली असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे. महामार्ग विभागातर्फे वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. सततच्या पावसामुळे व अवघड घाटामुळे कामात अडचण येत असून या मार्गाने आपले प्रवासाचे नियोजन असल्यास ते तात्पुरते स्थगित करावे, अशा सूचना देण्यात येत आहे.

chalisgaon-darad

पुराची धोक्याची सूचना

चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदी, उपनद्यांना व नाल्यांना मोठा पूर आलेला आहे, छोटे-मोठे बंधारे पाझर तलाव व (गिरणा धरण वगळता) इतर छोट्या-मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, हे पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे.

chalisgaon-Flood-of-Titur

अशी आहे परिस्थिती

सद्यस्थितीत आता जामदा बधार्‍यावरून १५०० क्यूसेस पाणी जात असून दुपारनंतर त्यात मोठी वाढ येऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गिरणा नदी काठावरील गावांना याद्वारे थोक्याचा इशारा देण्यात येत आहे.