Flipkart कडून बिग दसरा सेलची घोषणा ; अनेक वस्तूंवर मिळणार 80% पर्यंतची सूट, आताच पहा

ऑक्टोबर 2, 2022 4:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । फ्लिपकार्टने आपल्या आगामी बिग दसरा सेल 2022 ची घोषणा केली. हा कंपनीचा मोठा सेल असेल. त्याची सुरुवात या आठवड्यापासूनच होणार आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल चुकवला असेल, तर तुम्हाला या सेलमध्ये पुन्हा चांगली संधी मिळेल.

flipkart sale jpg webp

फ्लिपकार्ट बिग दसरा सेल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा सेल 8 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये, अनेक उत्पादनांवर बंपर डिस्काउंट व्यतिरिक्त, तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळतील. सेल दरम्यान, HDFC बँक कार्ड वापरकर्त्यांना सूट दिली जाईल. यामध्ये यूजर्सना सुलभ ईएमआय ऑफर देखील देण्यात येणार आहेत.

वर नमूद केल्याप्रमाणे, फ्लिपकार्टचा बिग दसरा सेल 5 ऑक्टोबरपासून सुरू होऊन 8 ऑक्टोबरपर्यंत असेल. तथापि, फ्लिपकार्ट प्लस सदस्य एक दिवस आधी म्हणजेच 4 ऑक्टोबर रोजी या सेलमध्ये प्रवेश करू शकतात. विक्रीबाबत कंपनीने म्हटले आहे की, सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मोबाईल फोनवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाईल. टीव्ही आणि गृहोपयोगी वस्तूंवर 75% पर्यंत सूट दिली जाईल.

बिग दसरा सेल दरम्यान बंडल पेमेंट आणि एक्सचेंज ऑफर देखील दिली जाईल असे मानले जाते. स्मार्टफोनबद्दल बोलायचे झाले तर Realme, Poco, Samsung, Oppo, Vivo, Apple, Xiaomi सारख्या ब्रँडच्या मोबाईलवर मोठी सूट दिली जाईल.

तुम्ही फ्लिपकार्ट बाय नाऊ पे लेटरद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला ५०० रुपयांचे गिफ्ट व्हाउचर दिले जाईल. याशिवाय, वापरकर्ते सेलमध्ये 199 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत मोबाइल संरक्षण योजना देखील घेऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now