जळगाव जिल्हा

“शावैम” मध्ये ध्वजारोहण ; संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२२ । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.

डॉ.रामानंद यांनी उपस्थित वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधला असता ते म्हणाले की, कोरोना काळात डॉक्टर्सपासून सफाई कामगारांपर्यंत सर्वच घटकांनी सर्वोत्तम कामगिरी केली. प्रतिकूल परिस्थितीत देखील खंबीरपणे उभे राहत केलेली रुग्णसेवा ही प्रशंसनीय आहे, असे मत डॉ. रामानंद यांनी व्यक्त केले

यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, डॉ.किशोर इंगोले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर, अधिसेविका प्रणिता गायकवाड यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क सहाय्यक विश्वजीत चौधरी यांनी केले.

हे देखील वाचा :

Related Articles

Back to top button