⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 5, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळमध्ये खडसेंना मोठा धक्का ; पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

भुसावळमध्ये खडसेंना मोठा धक्का ; पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२३ । भुसावळमध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना मोठा धक्का आहे. तो म्हणेज एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत गेलेले पाच माजी नगरसेवक, पदाधिकारी पुन्हा स्वगृही भाजपमध्ये परतले.त्यामुळे राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Savkare) यांच्या उपस्थितीमध्ये या नेत्यांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. भाजपच्या ९ नगरसेवकांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात आणि अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केला होता. मात्र आता यातील पाच जणांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यांचा झाला पक्षप्रवेश?
प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, माजी नगरसेवक बोधराज चौधरी, माजी नगरसेविका शैलजा नारखेडे यांचे पती पुरुषोत्तम नारखेडे, माजी नगरसेविका शोभा नेमाडे यांचे पुत्र दिनेश नेमाडे व अनिकेत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 9 माजी नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उर्वरीत दोघेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश केलेले हे पाचही माजी नगरसेवक हे एकनाथ खडसे यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आगामी निवडणुकींच्या दृष्टीकोनातून खडसे गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.