जळगाव लाईव्ह न्यूज । गोदावरी आय.एम.आर.तर्फे प्रगत संशोधन पद्धती, नैतिकता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता – प्रकाशनापासून निधीपर्यंत या विषयावर पाच दिवसीय राष्ट्रीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून कार्यशाळेत भारतभरातील तब्बल १३४२ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ही कार्यशाळा ११ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

कार्यशाळेत ११ मे रोजी डॉ. ज्ञानेश्वर किरंगे, १२ मे रोजी डॉ. संदीप पाटील, १३ मे रोजी मुंबई येथील डॉ. नीता पाटील, १४ मे रोजी डॉ. प्रियंका बर्हाटे आणि १५ मे रोजी डॉ. हेमंत इंगळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.कार्यशाळेमध्ये एआय आधारित संशोधन साधनांचा प्रभावी वापर, प्लॅजिअरिझम टाळण्याचे उपाय, स्कोपस आणि युजीसी केअर जर्नल्समधील संशोधन प्रकाशन प्रक्रिया, संशोधन प्रस्ताव लेखन तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन निधी योजनांविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

तसेच आधुनिक एआय संशोधन साधनांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात येणार आहे. संशोधनामध्ये एआय चा नैतिक व जबाबदारीपूर्ण वापर, शैक्षणिक प्रामाणिकता आणि गुणवत्तापूर्ण संशोधन यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.यासोबतच संशोधन लेखनातील तांत्रिक बाबी, योग्य जर्नल निवड, संशोधन प्रकाशनातील गुणवत्ता वाढविण्यासाठी आवश्यक बाबी तसेच संशोधन निधी मिळविण्याच्या प्रक्रियेबाबतही सहभागी संशोधकांना मार्गदर्शन मिळणार आहे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष गोदावरी फाउंडेशन, जळगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. तसेच कॉन्व्हेनर डॉ. प्रशांत वारके (संचालक आयएमआर), समन्वयक प्रा. चारुशीला चौधरी, आयोजन समिती सदस्य डॉ. नीलिमा वारके, डॉ. चेतन सरोदे, प्रा. स्मिता चौधरी, प्रा. वैजयंती असोदेकर, अॅडव्हायझरी कमिटी सदस्य डॉ. पराग नारखेडे, डॉ. जी. के. पटनाईक, डॉ. मनोज बेहरे, डॉ. प्राजक्ता पाटील तसेच समन्वय समितीतील प्रा. पायल भंगाळे आणि प्रा. लीना पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत.







