प्रवाशांसाठी खुशखबर! जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसला पाच अतिरिक्त डब्बे

नोव्हेंबर 23, 2025 11:56 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगावमार्गे धावणाऱ्या अमरावती-मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला पाच अतिरिक्त डब्बे जोडण्याचा निर्णय घेण्यात आहे.

amaravati

मुंबई-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे (गाडी क्रमांक 12111/12) ही कायम प्रवाशांच्या गर्दीने भरलेली असते. परिणामी प्रवाशांचे हाल होत असल्याने या गाडीचे डबे वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होती.

अखेर या मागणीला यश आले आहे. मुंबई-अमरावती आणि अमरावती-मुंबई या रेल्वेंना प्रत्येकी एक वातानुकूलित द्वितीय श्रेणीचा आणि चार अतिरिक्त शयनयान (स्लीपर कोच) जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला आता २२ डबे असतील. हा बदल कायमस्वरूपी करण्यात आला असून, या डब्यांमधील जागांचे आरक्षणही उपलब्ध झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now