---Advertisement---
जळगाव जिल्हा बातम्या महाराष्ट्र राजकारण

अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पहा कोणाला मिळाली संधी?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑक्टोबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत अजित पवार गटाने 38 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून विद्यमान आमदार अनिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलीय.

ajit pawar

महायुतीमधील तिन्ही घटक पक्ष भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या आहेत. दुसऱ्याबाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाकडून अजून उमेदवारी यादी जाहीर झालेली नाही. भाजपाने पहिल्या यादीत 99, शिवसेना शिंदे गटाने 45 आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 38 जणांना उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीने आतापर्यंत 288 पैकी 182 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित जागा लवकरच जाहीर होणार आहेत.

---Advertisement---

अजित पवार गटाच्या यादीत बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे.

अजित पवार गटाची संपूर्ण यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवाळ
अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
श्रीवर्धन – आदिती तटकरे
अंमळनेर – अनिल पाटील
उदगीर – संजय बनसोडे
अर्जुनी मोरगाव – राजकुमार बडोले
माजलगाव – प्रकाश दादा सोळंके
वाई – मकरंद पाटील
सिन्नर – माणिकराव कोकाटे
खेड आळंदी – दिलीप मोहिते
अहमदनगर शहर – संग्राम जगताप
इंदापूर – दत्तात्रय भरणे
अहमदपूर – बाबासाहेब पाटील
शहापूर – दौलत दरोडा
पिंपरी – अण्णा बनसोडे
कळवण – नितीन पवार
कोपरगाव – आशुतोष काळे
अकोले किरण लहामटे
वसमत – चंद्रकांत नवघरे

चिपळूण – शेखर निकम
मावळ – सुनील शेळके
जुन्नर – अतुले बेनके
मोहोळ – यशवंत विठ्ठल माने
हडपसर – चेतन तुपे
देवळाली – सरोज अहिरे
चंदगड – राजेश पाटील
इगतपुरी – हिरामण खोसकर
तुमसर – राजू कोरमेर
पुसद – इंद्रनील नाईक
अमरावती शहर – सुलभा खोडके
नवापूर – भरत गावित
पाथरी – निर्माला उत्तमराव विटेकर
मुंब्रा कळवा – नजीब मुल्ला

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---