डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन

मार्च 27, 2026 3:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या नव्या इमारतीचे प्रथम भूमिपूजन समारंभ जळगाव येथे पार पडला.

Dr. Ulhas Patil College of Physiotherapy

समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास पाटील व डॉ. वर्षा पाटील उपस्थित होते. या मंगल कार्याची पूजा राजपुरोहीत डी.टी.राव यांनी मंत्रघोषात डॉ. जयवंत नागुळकर व डॉ. कल्याणी नागुळकर यांच्या हस्ते विधीवत पूजा करून शुभारंभ केला. या प्रसंगी प्रशासक राहुल गिरी यांची विशेष उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन महाविद्यालय भविष्यात उत्कृष्ट फिजिओथेरपी शिक्षण देणारे केंद्र ठरेल, तसेच दर्जेदार आरोग्यसेवा व कुशल तज्ज्ञ घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केला.

New Project 2

समारोप प्रार्थनेने झाला आणि समाजसेवेच्या उद्देशाने आधुनिक व उत्कृष्ट शैक्षणिक संस्था उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रामनवमी निमित्ताने महाविद्यालयात विशेष पूजा व आरती करण्यात आली.भजन, स्तोत्र पठण यामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now