जळगाव जिल्ह्यात अपक्ष उमेदवारावर गोळीबार; राजकीय वर्तूळात खळबळ

नोव्हेंबर 5, 2024 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता प्रचाराला जोर आला आहे. मात्र याचा दरम्यान बोदवड तालुक्यात अपक्ष उमेदवारावर प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

Untitled design 6 jpg webp

याबाबत असे की, मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघामधून विनोद सोनवणे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून त्यांनी आज शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली आहे.

त्यानंतर त्याचा प्रचार दौर बोदवड तालुक्यात सुरू झाला. बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. दरम्यान याबाबत अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now