जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पाणीपुरवठा योजना द्वारे मिळणारे पाणी दूषित असल्यामुळे मुशरीफ पठाण व अरशद अली हे दोघी ग्रामपंचायत सदस्य एरंडोल तहसील कार्यालयासमोर प्रारांतिक उपोषणास बसले होते. त्यांच्या मागण्या मंजूर झाल्याचे पत्र जीवन प्राधिकरण उपविभागा कडून प्राप्त झाल्यामुळे ३० सप्टेंबर २०२२ रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते रस पान घेऊन उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी कासोद्याचे ग्रामस्थ नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान सणासुदीच्या काळात कासोदे गावाला शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होणार याची प्रतीक्षा केली जात आहे.