निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करा : शिवसेना जळगाव महानगरची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । माजी खासदार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली.
यावेळी महानगर प्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, युवासेना जिल्हा प्रमुख पियूष गांधी, उप महानगर प्रमुख प्रशांत सुरळकर, जितू साळुंखे, शेख शाकीर, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, वैद्यकीय आघाडीचे मोहसीन पिंजारी, राहुल पारचा, युवासेना उप जिल्हा प्रमुख विशाल वाणी, समन्वयक महेश ठाकूर, महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, ईश्वर राजपूत, महीला आघाडीच्या मनीषा पाटील, गायत्री सोनवणे, नीलू इंगळे, विमल वाणी, राणी सोनवणे, चारुलता सोनवणे, नीलू इंगळे,, व्यापारी सेनेचे पुनम राजपूत,, अमित जगताप, विजय बांदल, जितू बारी, विजय राठोड, बजरंग सपकाळे, डॉ जुबेर शेख, आबिद खान, प्रीतम शिंदे, गजू कोळी, तुषार पाटील, संस्कार मोहिते, सोमसिंह राजपूत, विशाल काळे, विवेक सारसर, रोहित दाभोळे, आदर्श चव्हाण, विलास पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
मा.खा .निलेश राणे यांनी शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर आक्षेपहार्य वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी जळगाव शहर पोलिस येथे तक्रार देण्यात आली असून त्यांच्यावर कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी शिवसेना जळगाव महानगर तर्फे करण्यात आली. राणे यांचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांच्यावर वेड्यांच्या इस्पितळात उपचार करावे अशा सतप्त भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.