जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । धरणगाव तालुक्यातील सोनवद येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येथील पोलीसांत परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील सोनवद येथील रहिवाशी पुरूषोत्तम भानुदास ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पुरूषोत्तम हे त्यांची पत्नी सुमन ठाकूर सोबत आपसात बोलत असताना गल्लीतील अर्जुन नागो कोळी, पंकज अर्जून कोळी, चावदास नागो कोळी, दिनेश नागो कोळी, हर्षल दिनेश कोळी, गौरव दिनेश कोळी, वसंत चिंतामन कोळी, सुग्रीव चिंतामन कोळी आणि चेतन कोळी सर्व रा. सोनवणे ता. धरणगाव यांनी पुरूषोत्तम व त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर दुसऱ्या फिर्यादीत नागो कोळी यांनी सांगितले की, पुरूषोत्तम भानुदास ठाकूर रा. सोनवणे हा त्याची पत्नी सुमन ठाकूर यांना शिवीगाळ व मारहाण करत होता. त्याला समजविण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करून धारदार धातूच्या पट्टीने मारहाण केली. या घटने प्रकरणी परस्परविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेद्र कोळी करीत आहे.