जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । शरीरातील आग लागण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास जुने बीजे मार्केटमध्ये खतांच्या दुकानाला आग लागली. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन बंबाने धाव घेत आग आटोक्यात आणली.

जळगाव शहरातील जुने बी.जे. मार्केटमध्ये तळमजल्यावर असलेल्या श्रीराम समर्थ ऍग्रो या खत विक्री दुकानात बुधवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जळगाव शहर मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेतली.

अग्निशमन दलाचे कर्मचारी कर्मचारी संतोष तायडे, देविदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील यांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.











