⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Erandol : तरुणाच्या जिद्दीला सलाम ; एकाच वर्षात मिळवली दोन सरकारी पदे

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । मनात जर काही बनण्याची इच्छा असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटी असायला हवी. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील एका तरुणाने जिद्द आणी मेहनतीच्या जोरावर एकाच वर्षात दोन सरकारी पदे मिळवली. फिरोज खाटीक असे या तरुणाचे नाव आहे.

फिरोजच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची, घरात सहा जणांचे कुटुंब…त्यात फिरोज हा मोठा मुलगा. त्यामुळे घर चालविण्याची जबाबदारी वडिलोपार्जित चिकन मटण विक्रीचा व्यवसाय इच्छा नसताना करावा लागत होता. तरी देखील फिरोजी खाटीक याने सरकारी नोकरी जाऊन परिस्थिती बदलण्याची जिद्द उराशी धरली‌.

तेव्हा घरचा गाडा चालत असे दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कशीतरी बारावी पूर्ण केली. परिस्थिती हलकीची असतानाही रायसोनी कॉलेज जळगाव ला एम. बी.ए. केले. परंतु उराशी स्वप्न होते सरकारी नोकरी मिळविण्याचे. चिकन विक्रीचा व्यवसाय व घर चालवितांना कुठलाही क्लास न लावता अभ्यास चालू होता सातत्य ठेवले मागील दोन तीन वर्षांपासून परीक्षेत अनुत्तीर्ण होत होता परंतुनियतीला हे मान्य नव्हते २०२३ मध्ये तलाठी, आरोग्यसेवक पदाची जाहिरात निघाली. त्याने परीक्षा दिल्या त्यात तो तलाठी, आरोग्यसेवक एकाच वेळेस दोन्ही परीक्षेत यश संपादन केले. गावातील एका वेळेस दोन परीक्षेत पास होणारा गावातील हा पाहिला ठरला.

एरंडोल पंचायत समितीचे माजी सदस्य भागवत पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यश मिळविण्यासाठी सातत्य कायम ठेवावे यश नक्कीच मिळते असे फिरोज ने सकाळशी बोलताना सांगितले.