धक्कादायक ! चाकूचा धाक दाखवून शेतकऱ्याच्या ८ बकऱ्यासह पिल्ले लांबवीले

मार्च 25, 2022 3:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२२ । जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटना वाढतच चालल्या आहे. अशातच चाकूचा धाक दाखवत ८ बकऱ्या व ४ बकरीचे पिल्ले जबरी हिसकावून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार भडगाव तालुक्यातील वलवाडी शिवारात घडलीय. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bakari

काय आहे प्रकार

याबाबत माहिती अशी की, बापू खंडू पाटील (वय-६५) रा. वलवाडी ता. भडगाव जि. जळगाव हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बकर्‍या व बकऱ्यांचे पिल्ले असून ते जोडधंदा करतात. दरम्यान गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ४ बकऱ्या व ४ पिल्ले जबरी चोरून नेले आहे.

याप्रकरणी बापू पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात तीन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now