⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | भारतीय अन्न महामंडळामध्ये बंपर भरती जाहीर; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी..

भारतीय अन्न महामंडळामध्ये बंपर भरती जाहीर; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । FCI Recruitment 2022 नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक संधी आहे. भारतीय अन्न महामंडळ म्हणजेच FCI ने काही पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय अन्न महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच FCI, fci.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑगस्टपासून सुरू होईल. तर ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022 आहे.

एकूण पदसंख्या : ११३

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मॅनेजर (जनरल)- 19
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]

2) मॅनेजर (डेपो) 15
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]

3) मॅनेजर (मूवमेंट) — 06
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]

4) मॅनेजर (अकाउंट्स )- 35
शैक्षणिक पात्रता :
B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.

5) मॅनेजर (टेक्निकल)- 28
शैक्षणिक पात्रता : B
.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)

6) मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)- 06
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

7) मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग) -01
शैक्षणिक पात्रता :
इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.

8) मॅनेजर (हिंदी)- 03
शैक्षणिक पात्रता :
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयोमर्यादा
व्यवस्थापक हिंदी: 35 वर्षे
इतर: 28 वर्षे

अर्ज फी
अर्ज फी: रु. 800/-
टीप- SC/ST/PWBD आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.

पगार
निवडलेल्या उमेदवारांना 40,000 ते 1,40,000 रुपये वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया
व्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, मुलाखत आणि प्रशिक्षणाच्या आधारे केली जाईल.
व्यवस्थापक (हिंदी) पदासाठी निवड प्रक्रिया ऑनलाइन चाचणी आणि मुलाखत यांचा समावेश असेल.

काही महत्वाची माहिती:
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात तारीख: 27 ऑगस्ट 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022

अधिसूचना वाचण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.