---Advertisement---
बोदवड

बाप रे.. येवतीला कपाशी कापून फेकली!

---Advertisement---

Bodawas News-जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२२ । बोडवल तालुक्यातील येवती येथे अस्मानी संकटातून वाचलेली कपाशी अज्ञातांनी चक्क बुंध्यापासून कापून फेकल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी शेतकर्‍याने बोदवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 67

येवती शिवारात अल्पभूधारक शेतकरी शब्बीर खा आलफ खा पठाण यांची गट क्रमांक 438 शेती आहे. त्यांनी खरीप हंगामात कपाशीची पिकाची लागवड केली. कपाशी पिके चांगली तरारली असतांना अचानक झालेल्या पावसानंतर ते गुरूवारी शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना चक्क कपाशी पिके कापून फेकल्याचे दिसले. नवीन फळधारणा झालेल्या कपाशी पिकावरील पिकावर एक एक झाडावर पन्नास ते साठ कैर्‍या पक्व झाल्या होत्या परंतु अज्ञातांनी या कपाशीच्या तब्बल पाव एकर क्षेत्रातील कपाशी कापणी करून नुकसान केले.

---Advertisement---

या प्रकरणी शेतकरी शब्बीर खा आलफ खा पठाण यांनी बोदवड पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हवालदार संतोष चौधरी, पोलिस नाईक संदीप वानखेडे करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---