Raver : पित्यासह लेकीचा ‘शॉक’ लागून मृत्यू

जून 14, 2025 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । रावेर तालुक्यातील तासखेडा येथे एक दुर्दैवी घटना समोर आलीय. ज्यात विजेचा धक्का बसून पित्यासह लेकीचा करुण अंत झाला. समाधान अशोक कोळी (३६) आणि त्यांची मुलगी मानवी कोळी (११) अशी या मृतांची नावे आहेत. समाधान यांच्या वडिलांनाही सुरुवातीला विजेचा धक्का बसला होता, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असताना ही घटना घडली.

two children die of cooler shock

समाधान यांचे वडील अशोक माधव कोळी हे घरात कापडे टांगण्यासाठी बांधलेल्या तारेवरील रुमाल घेण्यासाठी गेले असता त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. रुमालाला स्पर्श होताच तार तुटली आणि ते बाजूला फेकले गेले. हा प्रकार पाहताच समाधान व मानवी हे त्यांना उचलण्यासाठी पुढे आले.

त्यांना तुटलेल्या तारेचा स्पर्श झाला आणि ते तिथेच तारेला चिकटले. त्यांना रुग्णालयात आणले असता मृत घोषित केले. मृत बाप-लेकीवर शुक्रवारी तासखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. समाधान यांचे वडील अशोक कोळी यांच्यावर गावात खासगी डॉक्टरकडे उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले.

गावात हळहळ
१५ रोजी जागतिक पितृ दिन आहे (फादर्स डे) विशेष म्हणजे पितृ दिनाच्या एक दिवस आधीच वडिलांना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगा व नातीचा मृत्यू झाल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment