हृदयद्रावक ! जळगावमध्ये विद्युत वाहिनीचा झटका बसल्याचे बाप-लेकीचा मृत्यू, भाची गंभीर जखमी

डिसेंबर 5, 2025 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२५ । जळगाव शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनीचा झटका बसल्याने बाप-लेकीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मास्टर कॉलनीमधील अक्सानगर परिसरात आज दि ५ डिसेंबर रोजी सकाळी घडली. मौलाना साबीर खान नवाज खान (वय-३६) व आलिया साबीर खान (वय 12) असं मृत बाप-लेकीचे नाव असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

shabir khan

काय आहे घटना

मास्टर कॉलनीजवळ असलेल्या अक्सानगर परिसरात मौलाना साबीर खान नवाज खान यांची मोठी भाची मारिया फातेमाबी वय-१२ ही घराच्या गच्चीवर कपडे वाळत घालण्यासाठी गेलेली होती. कपडे वाळत घालताना तिच्या स्पर्श जवळच असलेल्या उच्चदाब विद्युत वाहिनीला झाला.

मारिया हिस विजेचा झटका बसल्याचे पाहून मामे बहीण आलिया वय-१६ हिने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिला देखील विजेचा झटका बसला. दोन्ही मुली संकटात असल्याचे पाहून मौलाना साबीर खान यांनी धाव घेतली. ते देखील विद्युत वाहिनीच्या गर्तेत अडकले.उच्च दाब विद्युत वाहिनीचा जोरदार झटका बसल्यामुळे मौलाना साबीर खान, मुलगी आलिया यांचा जागीच मृत्यू झाला असून भाची मारिया फातिमा ही गंभीर जखमी झाली आहे.

जखमी भाची हिस उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी आणण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि समाजातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे. दरम्यान, महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now