मुक्ताईनगर नजीक टँकर आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; एक ठार

नोव्हेंबर 6, 2025 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२५ । मुक्ताईनगर जवळ इंदोर-हैदराबाद महामार्ग टँकर आणि ट्रॅव्हल्स भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये टँकरमधील एक जण ठार तर ७ गंभीर जखमी झाले झाल्याची बातमी समोर आलीय.

tankbs ac

अकोटवरून इंदोरकडे जाणारी प्रवासी ट्रॅव्हल्स आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या केमिकल टँकरमध्ये समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमी जवळ, महादेव मंदिरासमोर हा अपघात रात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात टँकरमधील एक व्यक्ती जागीच ठार झाला असून ७ जण जखमी झाल्याची घटना समोर आलीय.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी व्यक्तीस उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.जखमींना मुक्ताईनगर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले.

हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.पोलिस पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories