---Advertisement---
जळगाव जिल्हा बोदवड

नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक यांच्या गैरप्रकारबाबत आमरण उपोषण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २ फेब्रुवारी २०२२ । बोदवड तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम बाबुराव निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये त्यांचे वडिल बाबुराव लक्ष्मण निकम यांच्या नावे असलेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान लाटले असून त्या प्रकरणी चाैकशी‎ व कारवाई करावी, या मागणीसाठी ‎ ‎ माहिती अधिकार कार्यकर्ता तथा‎ महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन‎ आसने यांनी तक्रार केली हाेती.‎ तिची संबंधित अधिकाऱ्यांनी दखल‎ घेतली नाही. त्यामुळे आता त्यांनी‎ सोमवारपासून आमरण उपाेषण सुरू‎ केले आहे.‎ ‎ ‎ ‎ ‎ 

uposhan jpg webp

आसने यांनी दि.०४ ऑक्टोबर २०२१ रोजी गौतम बाबुराव निकम यांनी सन २०१२-२०१३ व बाबुराव लक्ष्मण निकम यांनी सन २०१५-२०१६ मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते. परंतु निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ पैकी ९० आर मध्ये १ विहीर खोदकाम व बांधकाम न करता शासनाचा निधी लाटला आहे अशी तक्रार दाखल केली होती, संबंधित अधिकारी यांनी चौकशी व कारवाई न केल्याने पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण दि.०१ रोजी बसलेले आहे.

---Advertisement---

सदर लाभार्थी गौतम बाबुराव निकम हे नांदगाव येथे ग्राम रोजगार सेवक असून त्यांनी स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून विहिरीचे लाभामध्ये गैरप्रकार केलेला आहे. तरी संबंधित लाभार्थीवर कारवाई व शासनाच्या निधीची वसुली करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तालुकाध्यक्ष चेतन पाटील व संघटक गजानन पाटील यांनी केले आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---