⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अवकाळीमुळे शेतकरी बेहाल : पिकांचे झाले मोठे नुकसान

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी रात्री अवकाळी वादळी वार्‍यासह पावसाने हजेरी दिल्याने गव्हासह मका व कांद्याला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आधीच कांद्याला भाव नसताना झालेल्या नुकसानीमुळे कांदा उत्पादकांवर मोठे संकट कोसळले आहेत.

त्यातच राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने व त्यात कृषी, महसूलचे कर्मचारी सहभागी पंचनामे करण्यास आता पुन्हा दिरंगाई होणार असल्याने शेतकर्‍यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळ आली आहे.

काही ठिकाणी वीजतारा तुटल्या, तर काही झाडांच्या फांद्याही तुटल्या. ग्रामीण भागात घरावरील पत्रे उडाली. विजांचा कडकडाटानंतर जोरदार पाऊस झाल्याने अनेक सखल भागात पाणी साचले होते. गहू, हरभरा, केळी, लिंबू पिकांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, राज्य कर्मचार्‍यांचा संप सुरू असल्याने यात कृषी विभाग व महसूल विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक हे सामील झाल्याने पंचनामे करण्यास दिरंगाई होणार असल्याने नुकसानीचा आकडादेखील तो पर्यंत कळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कृषी विभागाचे तीन पर्यवेक्षक कामावर असल्याने ते शेतात जात असून नुकसानीची नोंद करीत आहे.