---Advertisement---
जळगाव शहर कृषी जळगाव जिल्हा

शेतकरी बांधवांनी बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले वाणाची लागवड करु नये

farmer
---Advertisement---

farmer

जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२२ ।शेतकरी बांधवाना आवाहन करण्यात येते की, बीटी कापसाच्या बियाण्यामध्ये परवानगी नसलेले तणनाशकाला सहनशिल असणारे Transgenic Glyphosate / Herbicide Tolerant trait  वापरुन अनेक बोगस कंपन्या / व्यक्ती / संस्था कापूस बियाणे विकत आहे.

---Advertisement---

 एचटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासुन पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट  हेण्याचा धोका संभवत आहे. नागरीकांच्या अन्न्‍ सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता, खरीप हंगाम २०२२ मध्ये कोणत्याही परिस्थीती शेतकरी बांधवांनी अशा वाणांची लागवड करु नये, तसेच या वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापुस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसुन आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७- २२३९०५४ वर माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्व्ये कळविले आहे.  

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---