---Advertisement---
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीळ पिकासाठी मिळणार ‘या’ योजनेचा लाभ..

farmer
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२५ । राष्ट्रीय खाद्यतेल अभियान- तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १०० % अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

farmer

यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत भुईमुग पिकासाठी कोल्हापूर / सातारा / सांगली / पुणे / अहिल्यानगर / नाशिक / धुळे / छत्रपती संभाजी नगर या ८ जिल्ह्यांतील शेतक-यांना व तीळ पिकासाठी जळगाव / लातूर / बीड / बुलडाणा या जिल्ह्यांतील शेतक-यांना लाभ देण्यात येणार आहे.

---Advertisement---

याकरिता महाडीबीटी च्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ या पोर्टलवर बियाणे, औषधे, खते या विभागा अंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करण्यासाठी १० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता योजनेंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी यात सहभाग वाढवावा यासाठी ही मुदत दि. १३ फेब्रुवारी, २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त शेतक-यांनी योजनेंतर्गत लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सह संचालक / जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी / उप विभागीय कृषी अधिकारी / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---