जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । जुलै 2020 मध्ये शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झालेला होता. त्यात जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये अनेक भूमिपुत्रांना याचा लाभ झालेला होता. परंतु वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्यापही जिल्ह्यातील 25 शेतकरी पिक विमा पासून वंचित आहेत. सध्याची परिस्थिती बघता शेतकरी अडचणीत सापडलेला असून शेतकऱ्याला बियाणे व खते घेण्यासाठी स्वतः जवळचे किडूक-मिडूक सुद्धा विकावे लागत आहे.
याच परिस्थितीची जाणीव असलेले अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील ग्रामस्थ प्रा. सुभाष पाटील यांनी शासन दरबारी बँक विमा कंपनी व जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन खूप प्रयत्न केले. शेतकऱ्यांचा विमा हा जिल्हा बँकेमार्फत काढला जातो.
परंतु सदर बँकेने एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीकडून विमा घेतला होता परंतु वंचित शेतकरी व प्राध्यापक सुभाष पाटील यांनी या कंपनीचे ऑफिस कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता कुठेही याची शाखा आढळून आली नाही आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देखील मिळालेले नाही ही बाब प्राध्यापक पाटील यांनी जिल्हा बँक, जळगाव जिल्हाधिकारी, जळगाव तसेच जिल्हा कृषी अधीक्षक, तहसीलदार यांच्या लक्षात आणून दिली तरीसुद्धा अजून काही कार्यवाही होताना दिसत नाही.
प्रा. सुभाष पाटील हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच आक्रमक असतात व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात शेतकऱ्यांना व्याजासकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी प्राध्यापक पाटील यांनी केलेली आहे.