⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

शेतकऱ्यांनो सावधान जिल्हात अवकाळीची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४४ अंश अश्या उच्चांकी पातळीवर जिल्ह्याचे तापमान अाहे. अवकाळी पावसाच्या सावटासह उष्णतेची लाट सक्रिय असल्याने जळगावकरांना उकाड्याने हैराण केले आहे. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट अली आहे. उत्तर महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत अवकाळी पाऊस आणि उष्णतेची लाट दाेघेेही सक्रिय असतील.असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामळे नागरिकांनी किंबहुना शेतकऱ्यांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.


विदर्भात मात्र येत्या १० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. गुरुवारी अकाेल्यात सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील विक्रमी ४४.२ अंश सेल्सिअस एवढे तापमान नाेंदवले गेले अाहे. शुक्रवारी तापमान ४४ अंशांवर असताना वाऱ्याचा वेग ताशी ११ किमीपर्यंत वाढलेला हाेता. सूर्याचा युव्ही (अल्ट्राव्हायलेट) इंडेक्स उच्चांकी ११च्या पातळीवर हाेता. त्यामुळे शुष्क वाऱ्याची दाहकता अधिक हाेती. दुपारनंतर काही काळ ५१ टक्क्यापर्यंत वातावरण ढगाळ हाेते. उकाडा वाढला हाेता. दरम्यान, शुक्रवारी हीच स्थिती राहील असा हवामान विभागाचा अंदाज अाहे. खान्देशात यामुळे पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.