चितोडा खून प्रकरण ; कोठडीतील चौघांना न्यायालयाने सुनावला पीसीआय

ऑगस्ट 29, 2022 5:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । तालुक्यातील चितोडा येथील मनोज संतोष भंगाळे (वय ३८) यांच्या खून प्रकरणातील अटकेत असलेल्या चौघांची न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने चौघांना पीसीआर दिला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
चितोडा येथील मनोज भंगाळे याला २१ ऑगस्टच्या रात्री उसनवारीचे घेतलेले ४ लाख रूपये घेण्यासाठी कठोर फाट्याजवळ बोलाविण्यात आले. यावेळी मनोज याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कल्पना शशिकांत पाटील (रा.चितोडा), देवानंद बाळू कोळी (मूळ रा.यावल, ह.मु. चितोडा) व मितेश उर्फ विघ्नेश भरतसिंग बारेला व जितेंद्र भगवान कोळी उर्फ आतंक (रा.अट्रावल) अटक करण्यात आली होती. या चौघांना २९ पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

chitoda murder case jpg webp

त्यानुसार या चौघांची कोठडी संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना पीसीआर सुनावला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, भूषण चव्हाण करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now