जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । ‘अतिवृष्टी’ग्रस्त 1756 शेतकऱ्याना सुमारे बागायती शेतकरी हेक्टर 27000 रुपये नुकसान भरभाई लवकरच मिळणार आहे, याबाबत प्रक्रिया सुरू असून सदर नुकसानग्रस्त शेतकरी यांची तपासणी करून, खाती खात्री करणे, कामे त्या – त्या गावातील तलाठी यांचे कडून तपासून येत्या 8 ते 15 दिवसात सदर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे समजते. यामुळे ऐन सणासुदीच्या व दिवाळीचे दिवसात शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे,

जळगाव जिल्ह्यात जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान झालेली अतिवृष्टी व उदभवलेल्या पूरपरिस्थिती मुळे बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत जाहीर करावी म्हणून मदतनिधीची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 10 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत व मंत्रीमंडळ घेतलेल्या निर्णयास अनुसरून माहे सदर जून ते ऑक्टोबर 2022 दरम्यान नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसान करीता बाधित शेतकऱ्याना वाढीव स्वरूपात मदत प्रदान करण्यास मान्यता देण्यात आली होती, त्याच अनुषंगाने सदर मदत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.

रावेर तालुक्यात जून महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, त्या नुसार 6 जून 2022 रोजी 25 गावातील 1356 शेतकऱ्यांच्या 794 हेक्टर शेत बागायतीचे नुकसान झाले होते. तर दि 11 जून 2022 रोजी 15 गावातील 400 शेतकऱ्यांच्या 331 हेक्टर शेत बागायतीचे नुकसान, असे दोन्ही मिळून 40 गावातील 1756 शेतकऱ्यांचे 1125 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते.












