धक्कादायक! कर्जफेडीच्या विवंचनेतून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन

ऑक्टोबर 4, 2024 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने समोर येत असून अशातच कर्जफेडीच्या विवंचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली आहे.

rigaon farmer succied

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे ही घटना घडली असून सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओंकार विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे दोन ऑक्टोबरला रिगाव शिवारातील शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.

दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now