⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | पावसाला सुरुवात : गाळण बु. येथे वीज पडून शेतकरी ठार

पावसाला सुरुवात : गाळण बु. येथे वीज पडून शेतकरी ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सून सरी कोसळल्या नसल्या तरी दोन दिवसांपासून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. पाचोरा तालुक्यातील गाळण बु” येथील एका ४६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करत असतांना सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विज पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यात कालपासून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. आज दि.९ रोजी देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सायंकाळी ५:३० वाजता सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी पाचोरा तालुक्यातील गाळण बु. येथील कैलास बारकु पाटील (वय-४६) हे आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होते. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट होऊन मोठा आवाज झाला. कैलास पाटील यांच्या शेजारीच विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

शेतातच काही अंतरावर त्यांच्या पत्नी देखील शेतात काम करत होत्या. त्यांनी एकच आक्रोश करत ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. मयत कैलास बारकु पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले.
यंदाच्या पावसाळ्यात एका निष्पाप शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

मयत कैलास बारकु पाटील यांचे पाश्चात्य पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. घटनेप्रकरणी

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.