जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३। सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक बेहाल झाले आहेत. यातच आज शेतकऱ्याचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

यावल तालुक्यातील मनवेल येथील राहीवासी शेतकर्याचा चोपडा तालुक्यातील मितावली येथे शेतातील काम करीत असताना तिव्र उष्मघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.१३ मे रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली.
उषघाताने मरण पावलेले मनवेल येथील रहिवाशी हुकूमचंद लक्ष्मण पाटील (वय ६७ ) हे आपल्या मितावली तालुका चोपडा येथील शेतात जे.सी.बी.मशीनने शेतातील कामे करीत होते. वाढत्या तिव्र तापमानामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. यानंतर काही मिनिटांमध्येच त्यांचा शेतातच मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.