---Advertisement---
मुक्ताईनगर

पावसाचा तडाखा : हताश शेतकऱ्याने नदीत उडी घेऊन संपविले जीवन

crime
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२१ । गेल्याच आठवड्यात राज्यातून बाहेर पडलेल्या मान्सूनमुळे काहीसा दिलासा मिळाला हाेता. मात्र, शनिवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने तडाखा दिल्याने उरलासुरला खरीप हंगामही पाण्यात गेला आहे. पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे पाहून हताश झालेल्या एका शेतकऱ्याने पूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील सातोड येथे रविवारी सायंकाळी उघडकीस आली.

crime

विनोद सीताराम पाटील (४०, रा. सातोड ता. मुक्ताईनगर) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.मुक्ताईनगर तालुक्यात दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. विनोद हे रविवारी दुपारी पिकांची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. पिकांचे नुकसान पाहून त्यांचा धीर सुटला. यानंतर ते घरी परतले आणि काही वेळाने खामखेडा येथील पुलावरून त्यांनी पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली.

---Advertisement---

शनिवारी रात्रभरात जिल्ह्यात सरासरी २० मिलिमीटर पाऊस झाला. जामनेर तालुक्यात सर्वाधिक ५३ मिलिमीटर पाऊस झाल्याने वाघूर धरणातून पाणी साेडावे लागले. १७ अाॅक्टाेबरपर्यंत जिल्ह्यात ८०९.७ मिलिमीटर म्हणजे वार्षिक सरासरीच्या १२३.४ टक्के पाऊस झाला. रविवारी सकाळपर्यंत सरासरी २० मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात साेमवारपर्यंत पाऊस मुक्कामी राहू शकताे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---