Wednesday, July 6, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

प्रसिद्ध गायक केके यांचे निधन…

kk death
सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
June 1, 2022 | 9:17 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२२ । प्रसिद्ध गायक केके (कृष्णाकुमार कुन्नाथ वय -५३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.

कार्यक्रमादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘तडप तडप के इस दिल से’ हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. केके यांनी स्वत: या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, गायक अरमान मलिक, अभिनेत्री सोनल चौहान आणि मुनमुन दत्तासह अनेक सेलिब्रिटींनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. केके सर या जगात आता नाहीत, यावर आमचा विश्वासच बसत नाही, असे म्हणत अरमानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

केके बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. केके यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘खुदा जाने’ सारखे रोमँटिक गाणे, ‘इट्स द टाइम टू डिस्को’ आणि ‘कोई कहे कहता रहे’ सारखे डान्स नंबर्स तसेच ‘तडप तडप के इस दिल से’ सारखे सॅड सॉन्गस आजही लोकांच्या मनावर राज्य करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “केके यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यांमधून अपार भावना प्रदर्शित व्हायच्या. सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यामध्येच असतील, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील. केके यांच्या कुटुंबाप्रति आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सामील आहे.”

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in निधन वार्ता
Tags: died
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
chopda 4

चोपडा तालुक्यात वादळाचा तडका, घरांवरील पत्रे उडाली

gas

LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात; वाचा आताचे नवीन दर

crime 2022 06 01T102647.110

मुलांमध्ये खेळू नको सांगितल्याने झाला मोठ्यांमध्ये वाद; प्रकरण पोहचले पोलीस सटेशनमध्ये अन...

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group