गुलाबराव देवकर कॉलेज प्रकरण : त्या मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट

फेब्रुवारी 20, 2026 5:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील शिरसोली रस्त्यावर असलेल्या गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी मधील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थी श्याम प्रभाकर पाटील (वय १९) याने प्राचार्याकडून झालेल्या मारहाणीमुळे जीवनयात्रा संपविली आहे. या घटनेनंतर जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, दोषी प्राचार्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. मात्र अद्यापही संबधित प्राचार्याला अटक करण्यात आली नाहीय. याच दरम्यान, मयत श्याम पाटीलच्या कुटुंबीयांनी जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत संताप व्यक्त केला आहे.

shyam patil

श्याम पाटील हा गेल्या दोन वर्षापासून गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याने १५ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरातील नेहरू नगर येथे त्याच्या रूमवर गळ#$फास लावून आत्म#$हत्या केली. घटनास्थळी त्याच्या खिशात सुसाईड नोट आढळून आली आहे.

Advertisements

त्यात त्याने म्हटले आहे की, प्राचार्य योगेश पवार यांनी मला सर्व शिक्षक स्टाफ आणि मित्रांसमोर अपमानित करून मारहाण केल्याचा केली. मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करायला गेलो असताना, समोरचा मुलगा मुले घेऊन आला तरी प्राचार्यांनी त्याला काहीच म्हटले नाही. उलट प्राचार्यांनी मला पीव्हीसी पाईपने बेदम मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. ज्यामुळे तो गंभीर मानसिक नैराश्यात गेला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं

Advertisements

दरम्यान या घटनेनंतर जळगावच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) तर्फे “विद्यार्थी स्वाभिमान आंदोलन” करण्यात आले. यानंतर संबंधित प्राचार्य योगेश पवार याला संस्थेने निलंबित केलं. मात्र अद्यापही प्राचार्य पवारला अटक करण्यात आली नाहीय.

यावरूनच मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत न्यायाची मागणी केली आहे. या घटनेबाबत पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्याचा आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी प्राचार्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. मात्र संबधीत प्राचार्य पवार हा फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now