जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे कापसाला योग्य न मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्याला मोठा फटका बसला असून त्यातच दुसरीकडे सोयाबीन उत्पादक शेतकरी देखील संकटात सापडला आहे. ऐकीकडे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असतानाचा सोयाबीनच्या भावात घसरण झाली आहे. सोयाबीनचे भाव दोनशे रुपयांनी उतरले असून यामुळे शेतकरी पुन्हा एखदा अडचणी सापडला आहे.

खरेदी केंद्राची मुदत संपल्याने अनेक राज्यातील शेतकऱ्यांची खरेदी रखडली आहे. हे शेतकरी आता बाजार समितीमध्ये सोयाबीन विक्रीसाठी दाखल होत आहेत. मात्र अनेक ठिकाणी सोयाबीनला कमी भाव दिला जात आहे. धाराशिवच्या कळंब बाजार समितीमध्ये सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार १०० रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे.
नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील बारा दिवसांपासून माजलगाव येथील नाफेड केंद्राबाहेर शेतकरी मुक्कामी आहेत. तर खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या आजही लांब रांगा लागल्याचे पाहण्यास मिळत आहे. बीड जिल्ह्यात ४४ हजार ७४४ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी नाफेड कडे नोंदणी केली होती. त्यातील केवळ वीस हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी झालेले आहे.
उर्वरित शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होण्यापूर्वीच नाफेड केंद्र बंद झालेत. खरेदी केंद्र चालकांकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने शेतकरी आजही खरेदी केंद्राबाहेर सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. योग्य निर्णय घेऊन किमान इतर ठिकाणी तरी सोयाबीनला हमीभाव द्यावा; अशी मागणी शेतकरी करत आहेत.