जळगाव शहरात पाचशेच्या नकली नोटा आढळून आल्याने खळबळ

ऑक्टोबर 10, 2024 5:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयाच्या परिसरात एका बुलेटवर आलेल्या चेतन शांताराम सावकारे ( वय-२७, रा. यावल) या तरुणाजवळ नकली पाचशे रुपयाच्या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

500 rs note jpg webp

या प्रकाराबाबत असे की, जळगाव शहरातील आर.आर. विद्यालयाच्या शेजारील असलेल्या गल्लीत संशयित आरोपी चेतन सावकारी हा बुलेट क्रमांक एमएच सीएल २२२१ वर आलेला होता. त्यावेळी त्याच्याकडे पाचशेच्या बनावट नोटा असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी चेतन सावकारे याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पाचशे रुपये किमतीच्या ९७ नोटा असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार मिलिंद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी चेतन सावकारे याच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now