⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

विधान परिषद : खडसेंना रोखण्यासाठीच फडणवीसांनी सोपवली आ. गिरीश महाजनांकडे जबाबदारी ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२२ । राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला दणका दिल्यानंतर आता विधानपरिषदेत जाण्यापासून एकनाथराव खडसे यांना रोखण्यासाठी भाजपने पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना जबाबदारी देण्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. फडणवीसांच्या नेत्तृत्वात्त गिरीश महाजन अँड कंपनीने राज्यसभेत शिवसेनेचा गेम केला होता. असाच गेम आता खडसेंचा व्हावा यासाठी निवडणुकीतही चमत्कार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या तीन मोठ्या नेत्यांना या ‘स्पेशल मिशन’ची जबाबदारी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री तथा आ. गिरीश महाजन यांचा समावेश असल्याची चर्चा आहे.

भाजपाने विधान परिषदेत प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड या ५ उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. अर्थातच यामुळे विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी अकरा उमेदवार मैदानात असून यासाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस २ काँग्रेस २ आणि शिवसेना २ असे ६ उमेदवार रिंगणात आहे.

आतापर्यंत राज्यसभेप्रमाणेच विधानपरिषद सदस्यांची निवडणूक सर्वपक्षीय सहमतीने बिनविरोध होत होती. परंतु यावेळी महाविकास आघाडीने राज्यसभेसाठी आव्हान देत शिवसेनेने दोन उमेदवार दिले तर भाजपाने देखील तीन उमेदवार दिले. यात तडजोड न झाल्याने राज्यसभेची निवडणूक चुरशीची ठरली. त्याप्रमाणेच विधानपरिषदेत देखील महाविकास आघाडीचे प्रत्येकी दोन तर भाजपाचे ५ असे ११ उमेदवार असल्याने निवडणूक अटळ असून चुरशीची असणार आहे, मात्र सगळ्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, आता यानिवडणुकित खडसे यांना पराभूत करण्यासाठी भाजपने कंबर कसला आहे असे म्हंटले जात आहे.

कारण राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विधान परिषदेच्या दोन उमेदवार देण्यात आले आहेत. यातील एकनाथराव खडसे हे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात हे भारतीय जनता पक्षाला माहीत असल्याने भारतीय जनता पक्ष विधान परिषदेमध्ये एकनाथ खडसे यांना टार्गेट करेल असं म्हटलं जात आहे. मात्र विधान परिषद निवडणूक जिंकायची असल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ३ मत कमी पडत आहे. ते मत मिळवण्यासाठी सर्व लोक कामाला लागले आहेत. मात्र हीच ३ मत निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हि ३ मत आता एकनाथराव खडसे यांना मिळतात की त्यांचा पत्ता देवेंद्र फडणवीस कट करतात. हे बघण आता उत्सुकतेचे ठरणार आहे.