⁠ 
मंगळवार, नोव्हेंबर 12, 2024
Home | राष्ट्रीय | Fact Check : कन्या सन्मान योजनेत केंद्र सरकार दरमहा जमा करणार २५०० रुपये?

Fact Check : कन्या सन्मान योजनेत केंद्र सरकार दरमहा जमा करणार २५०० रुपये?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२१ । मुलींच्या सन्मानार्थ केंद्र सरकारकडून अनेक योजना आणण्यात आल्या असल्या तरी सध्या एक नवीनच योजनेचा मेसेज व्हायरल होत आहे. कन्या सन्मान योजना अंतर्गत केंद्रातील मोदी सरकार मुलींच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपये जमा करत आहे. याचा एक व्हिडिओ आणि मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पीआयबीच्या फॅक्ट चेकने या व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर आणले असून ते सर्व फेक आणि दिशाभूल करणारे असल्याचे लक्षात आले आहे.

सोशल मिडियात व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये केंद्र सरकार देशातील प्रत्येक मुलीच्या बँक खात्यात दरमहा २५०० रुपये ट्रान्सफर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, ही माहिती पूर्णपणे दिशाभूल करणारी आहे आणि केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना चालवली जात नाही. पीआयबीच्या फॅक्ट चेकने या व्हायरल व्हिडिओचे सत्य समोर आणले आहे.

सरकारी योजनांच्या नावाखाली अनेक लोक फसवणूक करत आहेत. प्रथम केंद्राच्या योजनेच्या नावाखाली फेक न्यूज किंवा फेक व्हिडिओ किंवा फेक मेसेज व्हायरल होतात. यानंतर सामान्य लोकांना अर्ज करण्यास आणि त्यांचे वैयक्तिक आणि बँक तपशील सामायिक करण्यास सांगितले जाते. यानंतर त्यांच्यावर आरोप करून आर्थिक नुकसान करतात. अनेक वेळा लोकांची बँक खातीही रिकामी होतात. अशा फेक न्यूज आणि व्हिडिओंपासून सावध राहण्याची गरज आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.