‘या’ अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । १ नोव्हेंबर २०२१ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी दि.१५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
एम.सी.ए, एम.बी.ए, एम.बी.ए.(इंटीग्रेटेड), अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र व वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रीया सुरू होत आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर प्रवेश न मिळालेले विद्यार्थी व विद्यार्थ्यींनी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशाळा व संलग्नीत महाविद्यालयातील इतर अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी दि.१५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दि.१५ नोव्हेंबरपर्यंत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या तासिका पूर्ण करून घेण्याची जबाबदारी ही महाविद्यालयांची राहणार आहे. याबाबत विद्यापीठाशी संलग्नीत सर्व महाविद्यालये, परिसंस्था आणि विद्यापीठ शैक्षणिक प्रशाळा यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.