⁠ 
सोमवार, जून 17, 2024

सावधान! यावल तालुक्यात उष्माघातामुळे तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२४ । जळगाव जिल्ह्यात तापमान ४५ अंश सेल्यियसवर पोहचले असून वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास जाणवत आहे. याच दरम्यान यावल तालुक्यातील दहिगाव येथील एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. वैभव धर्मराज फिरके (वय २७ वर्ष) असं या मृत तरुणाचे नवा असून यामुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.

याबाबत असे की, यावल तालुक्यातील दहिगाव येथील महाजन गल्लीतील शेतमजूर वैभव धर्मराज फिरके (वय २७ वर्ष ) यांचा काल शनिवार सायंकाळी मृत्यू झाला. वैभव हा नुकताच शेतातून घरी परतला असता सायंकाळी पाच वाजेचे सुमारास त्यास अस्वस्थ वाटू लागले. त्याच्यावर खाजगी डॉक्टरांनी उपचार करीत असतांना तो मयत स्थितीत आढळून आला. वैभव फिरके यांचा मृत्यू वाढत्या तापमानाने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उष्माघाताने बळी गेल्याची ही यावल तालुक्यातील दुसरी घटना आहे.

दरम्यान, मयत वैभव फिरके हा कुटुंबात एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबियांनी आर्थिक मदत मिळावी अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.