⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Ahirani Pavari Songs : थिरकत्या पावलांचा जल्लोष, झिंगी पावरी, तारपा पावरीची धमाल ‘प्ले लिस्ट’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । खान्देशचा आणि अहिराणीचा फार संबंध आहे. खान्देशात अनेक भागात आजही अहिराणीच बोलली जाते. खान्देशच्या अहिराणीसोबत पावरी देखील प्रसिद्ध आहे. आदिवासी बांधवांमध्ये लोकप्रिय असलेल्या पावरी संगीताला नव्या दमाने एकबद्ध करीत तीन वर्षांपूर्वी झिंगी पावरी प्रदर्शित झाली होती. देशभरातून झिंगी पावरीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंत जळगाव खान्देश पावरी, आदिवासी तारपा पावरी, विकी भाग्या नि पावरी असे अनेक प्रकार सादर झाले आहे. सध्या पुन्हा लग्नसराईचा सीझन सुरु झाला असून लग्नात पावरी नृत्याची वेगळीच क्रेझ असते. पावरी सांगितलं युट्युबच्या माध्यमातून काही हजार नाही तर तब्बल १ कोटीपर्यंत देखील व्ह्यूज मिळालेले आहेत.

खान्देशातील नागरिकांची अहिराणी हि बोलीभाषा चांगलीच प्रचलित आहे. अहिराणी बोली भाषेचे वाढते महत्व लक्षात घेता अहिराणी गाण्यांची मागणी देखील वाढली आहे. लग्न, हळदी समारंभात आवर्जून अहिराणी गाणे लावण्याचा आग्रह केला जातो. अहिराणी गाण्यांच्या तालावर ठेका धरत वऱ्हाडी मंडळी जोशात नाचताना दिसतात. खान्देशात ज्याप्रमाणे अहिराणी गाणे प्रचलित आहेत तसेच पावरी संगीत देखील प्रसिद्ध आहे. विशेषतः आदिवासी समाजात पावरी नृत्य केले जाते. तसेच शिरपूर, धुळे, नंदुरबार परिसरात देखील पावरी नृत्यासारखे समूहाने एकाच वेळी एक तीन-चार पावली नृत्य केले जाते. झिंगी पावरी भिलाऊ गाण्यात देखील मोडले जाते. खान्देशातील प्रचलित पावरी आता जगभरात धुमाकूळ घालू लागली आहे.

पुरस्कारांचा वर्षाव झालेली ‘आदिवासी तारपा पावरी’
२१ जानेवारी २०२१ रोजी युट्युबच्या माध्यमातून रिलीज झालेली आदिवासी तारपा पावरी आज काही हजार आणि लाख व्ह्यूज नव्हे तर तब्बल ७० लाख व्ह्यूजचा टप्पा ओलांडून गगनावरी जाऊन पोहचली आहे. अमोल सूर्यवंशी प्रस्तुत आदिवासी तारपा पावरीला बेस्ट एडीटर अवार्ड – “रिल्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2021. नवादा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2021 मध्ये निवड आणि ” बेस्ट व्हिडीओ साँग 3rd ” गली आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2021. प्राप्त झाले आहेत. पावरीचे निर्माता अमोल सुर्यवंशी, संगीत प्रेम पवार आणि DJ गोलू धरणगाव, कलाकार गौरव पाटील, श्रृती पाटील आणि गृप, दिग्दर्शन उमेश कोळी, नृत्य दिग्दर्शन गौरव पाटील, डि.ओ.पी. & संकलन उमेश कोळी आणि राम सोनवणे, निर्मिती व्यवस्था निलेश सपकाळ, पोस्टर सागर महाजन, युथ फेस्टिवल गृप कलाशास्र व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. प्रसिद्धीची जबाबदारी सनलाईट फिल्म जामनेर, खांदेशी कलाकार, सर्व मित्र परिवार यांनी चोखपणे पार पाडली आहे. गाण्याचे आज ७६ लाख ७२ हजार युट्युब व्ह्यूज आहेत.

मि.खान्देशींचे धमाल गीत ‘जळगाव खान्देशी पावरी’
पावरी संगीताची सांगड घातलेले झिंगी पावरी हे गाणे मि.खान्देशी या युट्युब चॅनलवर तीन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आले होते. तीन वर्षात या गाण्याला तब्बल ७७ लाख ३६ हजार व्ह्यूज मिळाले आहे. उमेश तायडे आणि रत्नाकर कोळी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये खान्देशी झिंगी पावरी हे गाणे युट्युबला अपलोड केले होते. खान्देशी झिंगी पावरी नंतर त्यांनी जळगाव खान्देशी पावरी तयार केले असून तीन आठवड्यापूर्वी युट्युबला रिलीज करण्यात आले आहे. व्हिडीओला १ लाख ७७ हजारांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

गल्लोगल्ली गाजलेली २५ मिनिटांची नॉनस्टॉप धमाल ‘झिंगी पावरी’
पावरी नृत्य आदिवासी समाजासाठी प्रचलित असले तरी पावरीचा एक सर्वदूर परिचित असलेला एक प्रकार म्हणजे ‘झिंगी पावरी’. झिंगी पावरी डीजेच्या तालावर संगीतबद्ध करीत सादर केले ते Mr.Khandeshi या चॅनलने. २४ जानेवारी २०१९ मध्ये युट्युबला प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘झिंगी पावरी’चे आज तब्बल ८० लाख ६८ हजार व्ह्यूज आहेत आणि दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. झिंगी पावरीवर विशेषतः लग्न समारंभ आणि महाविद्यालयीन कार्यक्रमात तरुण-तरुणी ठेका धरताना दिसून येतात.

पावरीचा एक दमदार प्रकार ‘भिलाऊ पावरी’
पावरी संगीताचे विविध प्रकार युट्युबला Mr.Khandeshi या चॅनलने प्रदर्शित केलेले आहेत. झिंगी पावरीच्या अभूतपूर्व यशासोबतच आणखी एक प्रकार युट्युबला अपलोड करण्यात आला आहे. २९ जानेवारी २०१९ रोजी Mr.Khandeshi यांनी भिलाऊ पावरी देखील अपलोड केले होते. आज भिलाऊ पावरीला तब्बल ४० लाख ४६ हजार व्ह्यूज झाले आहे. झिंगी पावरी आणि इतर पावरीपेक्षा भिलाऊ पावरी काहीशी हटके वाटते. भिलाऊ पावरीसह युट्युबला कोकणी पावरी, मालेगाव खान्देशी सारखे देखील काही प्रकार उपलब्ध आहेत.

गिरडच्या मोहन बँडच्या ‘राम शाम पावरी’चे तब्बल १ कोटी व्ह्यूज
पावरी म्हटली कि बेभान नाचायचं आणि मनसोक्त आनंद लुटायचे संगीत. मोहन बैंड राम शाम प्रस्तुत पावरीचे निर्माता मोहन दयाराम पाटील, डायरेक्टर/म्युझिक/संगीतकार मास्टर राम आणि शाम आहेत. कोरिओग्राफर देखील संगीत रजनी मास्टर राम आणि शाम आहेत. सहकार्य रेकॉर्डिंग प्रसाद कांबळे, स्वर चंदन स्टुडिओ आळंदी, पुणे, येथील गुरुवर्य आदिनाथ महाराज कांबळे, गायक चंदन कांबळे, हरे राम कांबळे, अर्जुन शिंदे, संदीप मस्के पुणे, सुर नवा ध्यास नवा फेम कृष्णा अवघडे, अभिषेक कांबळे व ओमकार कांबळे यांचे लाभले आहे. कॅमेरामॅन – वास्तव डिजिटल फोटोग्राफी धरणगाव, सागर पाटील, जोगेश्वरी फोटोज पाचोरा, सिनेमॅटोग्राफर सुनील महाजन, व्हिडीओ एडिटिंग अल्पेश कुमावत पाचोरा. कॅमेरा असिस्टंट दिनेश देशमुख, सचिन पाटील धरणगाव यांचे सहकार्य लाभले आहेत. तसेच मेकअप साहाय्य नेहा ब्युटी पार्लर गिरड, सौंदर्य ब्युटी पार्लर यांचे लाभले आहे. ९ जानेवारी २०२० रोजी युट्युबला रिलीज केलेल्या या पावरीचे आजवर तब्बल १ कोटी ४२ लाख ४८ हजार व्ह्यूज झालेले आहेत.