जळगाव लाईव्ह न्यूज । प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने चार विशेष गाड्यांच्या फेऱ्यांचा विस्तार केला आहे. विशेष या गाड्या भुसावळ आणि जळगाव मार्गे धावणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला. दरम्यान या गाड्यांची वेळ, थांबे आणि रचना कायम ठेवत विस्तारित कालावधीत प्रवाशांना सेवा मिळणार आहे.

या गाड्यांचा समावेश
यामध्ये राजकोट-महबूबनगर (साप्ताहिक) विशेष गाडीचा ०९५७५ विस्तार २९ डिसेंबरपर्यंत असेल. गाडी क्रमांक ०९५७६ महबूबनगर-राजकोट विशेष गाडीचा विस्तार ३० डिसेंबरपर्यंत राहील. ओखा-मदुरै राहील. (साप्ताहिक) विशेष गाडीचा क्रमांक ०९५२० विस्तार २९ डिसेंबरपर्यंत तर गाडी क्रमांक ०९५५९ मदुरै-ओखा विशेष गाडीचा विस्तार २ जानेवारी २०२६ पर्यंत आहे.

तिरुपती-हिसार साप्ताहिक विशेष गाडीचा क्रमांक ०७७१७ विस्तार २४ डिसेंबरपर्यंत तर गाडी क्रमांक ०७७१८ हिसार-तिरुपतीचा विस्तार २८ डिसेंबरपर्यंत आहे. या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, थांबे आणि रचना यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नाही.
प्रवाशांनी गाड्यांचे तपशीलवार वेळापत्रक व थांबे जाणून घेण्यासाठी अॅप तसेच रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. या रेल्वे सेवांचा विस्तार झाल्याने भुसावळ रेल्वे स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. काही दिवसांपासूनरेल्वेला गर्दी वाढली आहेर






