जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑगस्ट २०२४ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेद्वारा विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष या गाड्या जळगाव-भुसावळ मार्गे धावणारे असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.
गाडी क्र. ०९०५१ दादर-भुसावळ आणि क्र. ०९०५२ भुसावळ – दादर त्रि- साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दि. ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, ट्रेन क्र. ०९०४९ दादर-भुसावळ साप्ताहिक आणि क्र. ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष गाडी २७ डिसेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
दुसरीकडे क्र. ०९०२५ बलसाड दानापूर साप्ताहिक गाडी ३० डिसेंबरपर्यंत, तर क्र. ०९०२६ दानापूर- बलसाड साप्ताहिक गाडी ३१ डिसेंबरपर्यंत. तसेच ट्रेन क्रमांक ०९५७५ राजकोट-मेहबूबनगर ही रेल्वे ३० डिसेंबर २०२४ पर्यंत, तर क्र. ०९५७६ मेहबूबनगर-राजकोट ही ३१ डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे. क्र. ०९०४५ उधना-पाटणा ही गाडी २७ डिसेंबर, तर क्र. ०९०४६ पाटणा- उधना साप्ताहिक विशेष गाडी २८ डिसेंबरपर्यंत. क्र. ०९०४१ उधना-छपरा ही गाडी २९ डिसेंबर, तर क्र. ०९०४२ छपरा-उधना साप्ताहिक गाडी ३० डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार आहे.