भुसावळ मार्गे धावणाऱ्या हडपसर-प्रयागराज रेल्वेला मुदतवाढ

मार्च 6, 2026 1:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अनेक गाड्यांच्या कालावधीत वाढ केली आहे. त्याचनुसार प्रयागराज-हडपसर-प्रयागराज विशेष रेल्वे गाडीच्या फेऱ्या २५ मार्चपर्यंत वाढवण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. विशेष ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

train

गाडी क्र. ०४१०७ प्रयागराज हडपसर ही गाडी २५ मार्चपर्यंत दर बुधवारी सकाळी १०.२० वाजता प्रयागराज येथून प्रस्थान करेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.३० वाजता हडपसर (पुणे) स्थानकावर पोहोचेल. गाडी क्र. ०४९०८ हडपसर या प्रयागराज परतीच्या प्रवासासाठी ही गाडी २६ मार्चपर्यंत दर गुरुवारी रात्री १०.४० वाजता हडपसर स्थानकावरून सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता प्रयागराजला पोहोचेल.

थांबे: दौंड चौर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, अंकाई, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खांडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, एमसीएस छतरपूर, दर्यागंज, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट, माणिकपूर.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now