जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे गद्यामध्ये वाढती गर्दी आणि मिळणार प्रतिसाद बघून रेल्वे प्रशासनाने भुसावळ आणि जळगावमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्यांना मुदतवाढ दिली. अशातच आता मध्य रेल्वेने भुसावळ-दादर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या सेवांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जळगाव, अमळनेर, धरणगावसह खान्देशातील प्रवाशांना दिलासा मिळेल. जुलैच्या अखेरपर्यंत या गाड्या सुरू राहणार आहेत.

०९०४९ दादर -भुसावळ साप्ताहिक विशेष गाडी जी पूर्वी २७ मार्च २०२६ पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यात येणार होती, तिचा कालावधी आता ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. तसेच ०९०५० भुसावळ – दादर साप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २७ मार्चवरून वाढवून ३१ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. ०९०५१ दादर भुसावळ त्रिसाप्ताहिक विशेष गाडी जी २८ मार्चपर्यंत दर सोमवार, बुधवार व शनिवार धावणार होती, तिचा कालावधी आता २९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे ०९०५२ भुसावळ – दादर त्रिसाप्ताहिक विशेष गाडीचा कालावधी २८ मार्चवरून वाढवून २९ जुलैपर्यंत करण्यात आला आहे. या सर्व गाड्यांच्या वेळा, मार्ग, संरचना व थांब्यांमध्ये कोणताही बदल केलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. दरम्यान, ही गाडी भुसावळ येथून मुंबईकडे जातानाअतिशय सोयीची ठरते.









