अखेर शिवसेनेतून या दोन नेत्यांची हकालपट्टी ; उद्धव ठाकरेंची कारवाई

ऑगस्ट 23, 2022 10:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२२ । एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आता ज्यांनी ज्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यावेळी पाठिंबा दिला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे.

shivsena jpg webp

अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाविरोधी कारवायाचा ठपका ठेवत मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची शिवसेनेतून (Shiv Sena) हकालपट्टी केली. पक्षाच्या उपनेतेपदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये उदय सामंत हे शिंदे गटात सहभागी झाले होते. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या खातेवाटपामध्ये उदय सामंत यांना उद्योग खाते मिळाले आहे. मात्र आता त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर आता उदय सामंत आणि यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now