⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

ग्रामपंचायतचे विजबील थकीत, नागरिकांना सोडले वाऱ्यावर

जळगाव लाईव्ह न्युज । २ जुलै २०२२ । एरंडोल तालुक्यातील रवंजे बुद्रुक ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहीरचा विद्युत पुरवठा विज बिल ग्रामपंचायत वर थकीत असल्यामुळे दि. २८ रोजी विज वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यानी गावातील वीज बंद {कट} केल्याने ऐन शेतीच्या कामधंदाच्या सीजन मध्ये लोकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

त्याच प्रमाणे गावातील स्ट्रीट लाईट व ग्रामपंचायतचा विज पुरवठा लाईट बिल थकबाकी असल्याने बंद केले आहे. गावकऱ्यांना गावात अंधारात राहावे लागत आहे. दि. २९ ला ग्रामपंचायतीची मासिक सभा {मिटिंग } होऊन सुद्धा सरपंच व ग्रामसेवक विज बिल भरणा करणे बाबात ठोस निर्णय घेत नाही.

त्यातच दुसरा विषय स्थानिक ग्रामसेवक मोरे गावात एक एक महिना दांडी मारत असून सरपंच व सदस्य त्यांच्या खाजगी कामात व्यस्त आहेत. गावा कडे कोणीही लक्ष्य द्याला तयार नाही जणू काही अंधेरी नगरी चौपट राजा अशी परिस्थिती झाली आहे. या बाबत वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून गावाचा विज पुरवठा व पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.