यावल तालुक्यातील अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्या
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीचे निवेदन सरपंच परिषदेतर्फे यावल पोलीस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुधिर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील एका गावात १५ वर्षिय अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुले व एक तरुणाने सामुहिक अत्याचार केला. या तिन्ही संशयीत आरोपींना कठोर शिक्षा करावी, यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकिल ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तसेच पिडीत मुलीला आर्थित मदत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सरपंच परिषदेचे तालुका सचिव अजय अडकमोल, तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद , तालुका उपाध्यक्ष भुषण पाटील, महिला तालुका अध्यक्ष अलका पाटील, वढोदे सरपंच संदिप सोनवणे, प्रतिप कोळी, अजय भालेराव, निलेश कोळी, समाधान पाटील, अरुण माळी, नवाज तडवी, आधार खळके, रामकृष्ण सोळंखे, वर्षा कोळी, सुनिल कोळी यांच्याव्दारे निवेदन देण्यात आले.
हे देखील वाचा :
- मुंबई-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात अमळनेरच्या दाम्पत्याचा मृत्यू
- जळगावात शिंदे गटाने फिरवली भाकरी; जिल्हाप्रमुखपदी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती !
- सावद्यात लाखो रुपयांचा अवैध गुटखा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
- रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते
- गोदावरी अभियांत्रिकीत उद्या स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन