⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

Exclusive : तर मी राजकारण सोडून देईल – आ. अनिल पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज ।Mla Anil Bhaidas Patil । गेल्या अडीच वर्षात जळगाव जिल्ह्यातील पाचही शिवसेना आमदारांना जितका निधी मिळाला तितका निधी जळगाव जिल्ह्यातील इतर कोणत्याही आमदाराला मिळाला नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत असलेले शिवसेना आमदार यांनी स्वतःचा वार्षिक अहवाल सादर करावा. आणि जर या अहवालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील आमदाराला जर शिवसेनेच्या आमदारांपेक्षा जास्त निधी मिळाला असेल तर मी राजकारण सोडून देईल असं खुलं आव्हान आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ‘जळगाव लाईव्हशी’ बोलताना दिलं आहे. (Mla Anil Bhaidas Patil)

महाराष्ट्रात झालेल्या सत्या नाट्यानंतर संपूर्ण शिवसेना आमदार हे केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला टारगेट करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिवसेनेच्या इतर आमदारांपेक्षा खूप जास्त निधी मिळाला असे आमदार वारंवार टीका करत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी जर शिवसेनेच्या इतर आमदारांपेक्षा मला अधिकचा निधी मिळाला असेल तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं खुल आव्हान दिला आहे. नगर विकास खात्यातून गेल्या अडीच वर्षात मला निधी मिळाला नाही असेही ते म्हणाले. शिवसेना आमदार करत असलेली टीका हे धाधांद खोटं आहे. असेही यावेळी आमदार अनिल पाटील म्हणाले.

पुढे जाऊन ते असेही म्हणाले की, सर्व आमदारांना मिळालेला एकूण निधीचा वार्षिक अहवाल या आमदारांनी सादर करावा. वेळोवेळी आपापल्या मतदारसंघात लावलेले फ्लेक्स आणि त्याचा केलेला प्रचार याची आठवण ठेवावी. नाहीतर आपण केलेला प्रचार हा खोटा होता असं सांगावं. असं आव्हान यावेळी आमदार पाटील यांनी दिल आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे बसल्यापासून शिवसेना आमदार व शिवसेना नेते मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना संपवण्याचे काम करत होता. असं सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत होता. मात्र शिवसेना आमदारांना तो मिळत नव्हता असा आरोपही यावेळी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे. यावर उत्तर देताना आमदार अनिल पाटील यांनी सांगितले की, नगर विकास खात्यातन आम्हाला निधी मिळत नव्हता. मात्र आमच्या वरिष्ठांचे आदेश पाळून आमचे काम करत होतो. तोंड दाबून बुक्क्याचा मारा आमच्यावर होत होता मात्र आम्ही केवळ आणि केवळ शांततेत आमच काम करत होतो.