⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

Exclusive : जळगावात भाजप आमदारांच्या घर, कार्यालयाची सुरक्षा वाढवली!

जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ | शिवसेना नेते तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे नॉटरिचेबल असून त्यांनी बंडाचा हत्यार उचलला आहे. अशावेळी शिवसैनिक त्यांच्यावर नाराज असून भारतीय जनता पक्षात आहे त्यांच्याकडून करून घेत आहे असा आरोप शिवसैनिकांचा असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसैनिकां तर्फे भाजपाचा निषेध करण्यात येत आहे.म्हणून आमदार भोळे याची सुरक्षा वाढविण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्या मधील फोनवर चर्चा झाल्याची बातमी समोर येत आहे. यावेळी शिंदे यांच्याशी चर्चा करताना शिंदे यांनी आपल्या ठाकरे यांना सांगितले असल्याचे समजत आहे. मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवर ही चर्चा झाली. यावेळी मला मंत्रिपद नको आहे. पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मात्र शिवसैनिक नाराज आहेत. यामुळे ते भाजपा आमदारावर नाराज आहेत.

मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेच ठरणार होत. पण मला मंत्री करू नका पण भाजपा सोबत युती करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अद्याप किती आमदार आणि मंत्री आहेत हे स्पष्ट होऊ शकले नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेच्या बैठकीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिंदे यांना गटनेते पदावरून हटविण्याचा निर्णय झाल्यावर शिंदे यांनी हे ट्विट केले. त्यानंतर शिंदे यांची भेट नारवेकर यांनी घेतली यावेळी त्यांनी फोन वरून शिंदेंशी चर्चा केली. आता